उत्राणे गावाची माहिती

नाशिक जिल्यातील बागलाण तालुक्यात उत्राणे हे गाव आहे. महाराष्ट्रातील नाशिक मधील बागलाण मधील उत्राणे हे सर्वात विद्वान व प्रतिष्ठित गावांपैकी एक आहे, विशेषतः डाळिंब आणि कांद्यासाठी. हे गाव बागलाणच्या मध्यभागी, नामपूर शिव (बागलाण) जवळ आहे. सदर उत्राणे गावाला जोडगाव राजपूरपांडे मिळून ग्रुप ग्रामपंचायत उत्राणे येथे आहे. सदर ग्रुप ग्रामपंचायतीची एकूण ३४६८ लोकसंख्येसह हे एक शेतकरी समृद्ध असे गाव म्हणून ओळखले जाते , हे गाव नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे याशिवाय येथे उत्कृष्ट असे देखणे श्रीराम मंदिर, हनुमान मंदिर, लोक सुविधेसाठी प्रशस्थ असे ग्राममंगल कार्यालय उत्राणे देखील आहे. याशिवाय येथे मऊ आणि थंड हवामान देखील आहे ज्यामुळे शेतीला चालना मिळत आहे. या गावात जि. प शाळा १ ते ४ वर्गाच्या ३ वेगवेगळ्या गावांतर्गत शाळा आहेत त्याच बरोबर पूर्वीपासून दोघ गाव मिळून ४ अंगणवाडी आहेत तसेच जनता विद्यालाय उत्राणे या नावाने गावाच्या मध्यावर ५ वी ते १० वी पर्यंत आहे. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व शेत मजुरी आहे. पावसाळ्यात मुख्यताः भात, नागली, बाजरी, भुईमूग, सोयाबीन ईत्यादी पिके घेतली जातात. उत्राणे :- उत्राणे हे गाव तालुक्यापासून २० कि. मि. अंतरावर असुन ग्रामपंचायतीची स्थापनाः- सन 1952 गावाजवळचे बसस्थानक नामपूर. उत्राणे गावात सब पोस्ट ऑफिस आहे. उत्राणे गावचा पिन कोड ४२३२०४ हा आहे. गावालगत प्रमुख तीर्थस्थळे :- श्रीराम मंदीर, हनुमान मंदिर,त्रीगुनेश्वर मंदिर, महादेव मंदिर लोक सुविधेसाठी प्रशस्थ असे ग्राममंगल कार्यालय उत्राणे , तालुकापासुंचे गावाचेअंतर :- २७ किमी.